अंबरनाथ: अंबरनाथ येथे इमारतीच्या डक्टमध्ये आढळला नवजात स्त्री जातीच्या अर्भकाचा मृतदेह, जन्मदात्रीनेच फेकून देण्याचा संशय
अंबरनाथ पश्चिम परिसरामध्ये एक खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे. इमारतीच्या डक्ट मध्ये स्त्री जातीचे नवजात अर्भक फेकून दिल्याची घटना घडली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी सदरचे नवजात अर्भक ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवले मात्र डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे सांगितले. इमारतीत राहणाऱ्या एका महिलेने रात्रीच्या सुमारास नवजात अर्भकला जन्म दिला होता आणि ते स्त्री जातीचे होते त्यामुळे फेकून दिले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून पुढील तपास