अंबरनाथ: आजच्या शुक्रवारची जिल्ह्यातील सर्वात थंड दिवस म्हणून नोंद; बदलापुरात सर्वात कमी तापमानाची नोंद
आजचा शुक्रवार हा यंदाच्या हिवाळ्यातील ठाणे जिल्ह्यातील सर्वात थंड दिवस ठरला आहे. आज बदलापुरात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 च्या सुमारास बदलापुरात 11.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. त्या खालोखाल अंबरनाथ, उल्हासनगर शहरातही सरासरी 12 अंश सेल्सिअस तापमान होते. त्यामुळे आजचा शुक्रवार हा थंड दिवस ठरला आहे. गेले काही दिवसात राज्यात थंडीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे सर्वच शहरांमध्ये कमी तापमानाची नोंद होते आहे.