बदनापूर: नगरपरिषदेत शिवसेनेचा एकही नगरसेवक निवडून येणार नाही आ.नारायण कुचे चा भाजपा कार्यालय येथे टोला
Badnapur, Jalna | Nov 30, 2025 आज दिनांक 30 नोव्हेंबर 2025 वार रविवार रोजी सायंकाळी 6 वाजता बदलापूर येथे भाजपा संपर्क कार्यालयावर बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी शिवसेना शिंदे गटाचे सिल्लोड चे आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका केली आहे व म्हटले आहे,की अब्दुल सत्तार यांच्या पक्षाचा शिवसेनेचा एकही नगरसेवक अंबड नगरपरिषद निवडणुकीमध्ये निवडून येणार नाही,आणि तसे झाले तर मी त्यांच्यासमोर उठबशा मारेल असे म्हणत त्यांनी आ.अब्दुल सत्तार यांच्यावर टोला लगावला आहे.