बदनापूर: राजुर पैठण मार्गाचे काम रखडल्याने शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात होणार नाल्यांची समस्या
Badnapur, Jalna | Jun 15, 2026 आज दिनांक 15 जून 2026 वार सोमवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास बदनापूर शहरातील रेल्वे स्टेशन परिसर तसेच जामखेड चौफुली या भागात राजूर ते पैठण या मुख्य मार्गाचे काम होत आहे मागील काही दिवसापासून हे काम रखडले आहे आणि या रखडलेल्या कामामुळे रोडच्या दोन्ही साईडला नाली बांधकाम ही रखडले आहे त्यामुळे पावसाळ्यात शहरवासी यांचे वाहणारे पाणी मुख्य रोडवर येणार आहे आणि यामुळे शहरवासीयांना त्रास होणार असल्यामुळे संबंधित विभागाने वेळीच नाली बांधकाम पूर्ण करावी अशी मागणी होत आहे.