कल्याण चिकणघरच्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी शिवसेना शाखा प्रमुख चेतन म्हामूनकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा!
९ मीटरचा डी.पी. रस्ता प्रत्यक्षात ५ ते ६ मीटरवर; अनधिकृत अतिक्रमण हटवून रस्ता रुंदीकरणाची मागणी
कल्याण : चिकणघर विभागातील किसन हाईट्स (म्हसोबा रिक्षा स्टॅन्ड) ते नामदेव विहार (मंगेशी वर्ल्ड) या मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ९ मीटर मंजूर असलेला डी.पी. रस्ता प्रत्यक्षात केवळ ५ ते ६ मीटरपर्यंतच उपलब्ध असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होत असून अपघातांचा धोका वाढत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना शाखाप्रमुख चेतन म्हामुणकर यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांना स्मरणपत्र देत रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमणे हटवून रस्ता रुंदीकरणाची मागणी केली आहे.
स्मरणपत्रात म्हटले आहे की, या रस्त्याच्या पुढे मोठ्या गृहसंकुलांसह मंगेशी एलाइट आणि मंगेशी वर्ल्ड
Kalyan, Thane | Oct 6, 2026