पालघर: जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता; हवामान विभागामार्फत 'यलो अलर्ट' जारी
भारतीय हवामान विभागामार्फत प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात सहा मे रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाची शक्यता पाहता हवामान विभागाने यलो जारी केला आहे. विजांचा कडकडाट मेघगर्जनेसह जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता उन्हाळी भात भुईमूग,फळे,भाजीपाला काढणी करावी. धान्य, जनावरांचा चारा व जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे.