पालघर: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कासा येथे नागरिकांचे आंदोलन
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटक नागरिकांचा जीव गेला आहे. या घटनेमुळे देशभरात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. कासा येथे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. दहशतवादी हल्ल्यातील मृतकांना श्रद्धांजली अर्पण करून दहशतवाद्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. दहशतवाद्यांना धडा शिकवून चूक प्रतिउत्तर, कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली. कासा परिसरातील नागरिक,तरुण-तरुणी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले.