रामटेक: महादूला - घोटी टोक मार्गाने गो तस्करीचा प्रयत्न बजरंग दलाच्या गोरक्षकांनी पाळला हाणून
Ramtek, Nagpur | Mar 13, 2026 पो. स्टे.रामटेक अंतर्गत येणाऱ्या महादूला घोटीटोक परिसरात तुमसर कडून गोतस्करी होत असल्याच्या गुप्त माहितीवरून बजरंग दलाच्या गोरक्षकांनी शुक्रवार दि. 13 मार्चला मध्यरात्री गोतस्करी करणाऱ्या एका कारला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र अवैधपणे पशु वाहून नेणाऱ्या या कारच्या चालकाने कार न थांबविता ती घोटीटोक वरून कोदामेंढी अरोली मार्गे वेगाने पळविली. बजरंग दलाच्या गोरक्षकांनी कारचा पाठलाग केल्याने घाबरलेल्या अज्ञात कारचालकाने गाडी थांबून ती सोडून अंधाराचा फायदाघेऊन पळ काढला.