मुरुड: गतवर्षीच्या तुलनेत मुरुडमध्ये पर्यटक संख्या कमीच
Murud, Raigad | May 24, 2026 मुरुड शहरात सध्या पारा सकाळी 36 अंश सेल्सिअस असतो. सकाळपासून गरम वातावरण असल्याने समुद्राच्या गार पाण्यात कुल कुल होण्यासाठी पर्यटक मुरुडला उन्हाळी सुट्टी मुरुडला एन्जॉय करण्यासाठी आले आहेत. गेली 2 दिवस अतिशय गरम असल्याने पर्यटक वातानुकूलित रूममधून बाहेर पडत नाहीत. त्यामुळे प्रचंड तापमानामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत पर्यटकांची संख्या कमीच आहे. राज्यात सर्वत्र परीक्षांचे निकाल लागले. सुट्टी जाहीर झाल्याने कोकणातील समुद्रकिनाऱ्यांकडे पर्यटकांनी धाव घेतली आहे. पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी आहे.