कामठी: कामठी तालुक्यातील महत्त्वाच्या रस्त्याच्या बांधकामाचे खासदार श्याम कुमार बर्वे यांच्या हस्ते भूमिपूजन
कामठी विधानसभेअंतर्गत कामठी कॅन्टोनमेंट परिसरातील नागरिकांची अनेक दिवसांपासूनची प्रलंबित मागणी अखेर पूर्णत्वास येत आहे. कामठी शहर ते कामठी छावनी ते जुनी कामठी या महत्त्वाच्या रस्त्याच्या बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, आज या रस्त्याचे भूमिपूजन खासदार श्याम कुमार बर्वे यांच्या हस्ते संपन्न झाले.हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.