शहादा: शिरुड चौफुलीजवळ पान अँड कोल्ड्रिंक्स शॉपमधून १५ हजार ३१९ रुपयांचा गुटखा पोलिसांनी केला जप्त, शहादा पोलिसांत गुन्हा दाखल
पान सेंटरमध्ये प्रतिबंधित गुटखा पानमसाला व तंबाखुसाठा विक्री करतांना मिळुन आलेल्या एकावर ४ एप्रिल रोजी कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याकडुन १५ हजार ३१९ रुपयांचा गुटखासाठा जप्त करण्यात आल्याची कारवाई केली आहे. शहादा येथील प्रकाशा रस्त्यालगत शिरुड चौफुलीजवळ भावेश पान ॲण्ड कोल्ड्रींक्स शॉपमध्ये प्रतिबंधित गुटखा व तंबाखुची विक्री केली जात होती. शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.