शहादा: आमदार संपर्क कार्यालयात भाजप पक्षाच्या वर्धापनदिनी आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण
भारतीय जनता पक्षाचा ४५ वा वर्धापन दिन सोहळा आमदार संपर्क कार्यालय येथे शनिवारी सकाळी पार पडला. भारतीय जनता पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहण आमदार राजेश पाडवी यांचा हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष नूहभाई नुरानी, जिल्हा उपाध्यक्ष विनोद जैन, तालुकाध्यक्ष नितीन पाटील, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.