शहादा: सारंगखेडा येथील तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचा मृतदेह सापडला, मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला
धुळे येथील यश श्रीराम गांगुर्डे या २१ वर्षीय युवकाने सारंगखेडा येथील तापी नदीच्या पुलावरून गुरुवारी सायंकाळी पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्याचा शुक्रवारी दिवसभर तापी नदीच्या पात्रात पोहणाऱ्यांच्या मदतीने मृतदेह शोधण्यात आला. यानंतर मृतदेह सारंगखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन वैद्यकीय अधिकारी राजन दुगड यांनी शवाविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.