शहादा: पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळातर्फे लोणखेडा गावात काढली मतदार जनजागृती रॅली
लोणखेडा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने मतदार जागृतीसाठी महाविद्यालय ते लोणखेडा गावापर्यंत रॅली काढली. ही रॅली ५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता काढली. रॅलीत प्रांताधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी सुभाष दळवी, गटशिक्षणाधिकारी डॉ. योगेश सावळे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. कल्पना पटेल , पर्यवेक्षक प्रा. के. एच. नागेश आदी उपस्थित होते.