शहादा: म्हसावद येथे वडिलोपार्जित शेतीच्या वादातून एकाला मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, पोलिसात गुन्हा दाखल
म्हसावद येथे वडिलोपार्जित शेतीच्या वादातून एकाला पाटीवर व मानेवर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना दिनांक 6 मार्च 2024 रोजी रात्री आठ वाजता घडली होती याप्रकरणी माझा आवाज पोलीस ठाण्यात उशिराने 4 एप्रिल 2024 रोजी दुपारी एक वाजून 36 मिनिटांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार योगेश केसरीमल बेदमुथा यांना सचिन किशोर बेदमुथा त्याचा भाऊ पियुष किशोर बेदमुथा या दोघांनी जबर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.