उमरेड: ९० दिवस काम केल्याची खोटी प्रमाणपत्रे देऊन शासनाची फसवणूक; आरोपीना अटक
Umred, Nagpur | Jun 4, 2026 महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम क्षेत्रात किमान ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असते. मात्र, काही ठेकेदार आणि ऑनलाइन सेवा केंद्र चालकांनी प्रत्यक्षात काम न केलेल्या व्यक्तींना खोटी आणि बनावट प्रमाणपत्रे दिली.