कामठी: परप्रांतीयांनी नियमबाह्य पद्धतीने केलेल्या जमीन खरेदीवर कारवाई होणार; महसूल मंत्र्यांचा मोठा इशारा
"शेतकरी नसतानाही परप्रांतीयांनी महाराष्ट्रात जमीन खरेदी करणे हे थेट महाराष्ट्र कुळ कायद्याच्या विरोधात आहे. अशा बेकायदेशीर जमीन व्यवहारांवर आम्ही कडक कारवाई करणार आहोत," अशी स्पष्ट आणि आक्रमक भूमिका राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली. ते आज विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.