महाड: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना दहा दिवसांत ४२ लाखांचा दंड
Mahad, Raigad | Jun 26, 2026 शिस्त आणि नियम मोडणाऱ्यांवर कारवाई ही होतेच हे वाहतूक शाखेने नेहमीच दाखवले आहे. नुकत्याच शाळा महाविद्यालये सुरू झाली आहेत. त्यामुळे अधिक कठोरपणे वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. दहा दिवसात चार हजार २७ चालकांना दणका मिळाला आहे. बेशिस्त चालकांविरोधात कारवाई करीत जिल्हा वाहतूक शाखेने ४२ लाख ३१ हजार ४२७ रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती समोर आली आहे. नियम मोडणाऱ्या चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न या दंडात्मक कारवाईतून करण्यात आला आहे.