बदनापूर: मुंबई मंत्रालय येथे आमदार नारायण कुचे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
Badnapur, Jalna | May 26, 2026 आज दिनांक 26 मे 2026 वार मंगळवार रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारात बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची मुंबई मंत्रालय येथे भेट घेतली आहे ,याप्रसंगी विधान परिषदेच्या सदस्य पदाच्या जागेवरून त्यांनी चर्चा केली आहे, तसेच राज्याच्या विविध मुद्द्यावर सुद्धा चर्चा केली आहे ,यावेळी भाजपाचे जालना जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.