जळगाव लाईव्ह न्यूज । जामनेर तालुक्यातील टाकळी रस्त्यावरील आर्यन हॉटेलमध्ये दारू आणि जेवण न दिल्याच्या कारणावरून मध्यरात्री राडा झाला. हॉटेल चालक आणि कर्मचाऱ्यांना तिघांनी मारहाण करून तोडफोड करण्यात आली. मारहाणीचा प्रकार हॉटेलमधील सीसीटीव्हीत कैद झाला असून याप्रकरणी कल्पेश माळी, मयूर शिवद आणि मनोहर राऊत (तिघे रा. जामनेर) यांच्याविरोधात जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews #jamner