Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

उरण: पावसाळा तोंडावर; उरणचा कृषीविभाग मात्र 'ढीम्म'

Uran, Raigad | Jun 10, 2026
मृग नक्षत्राच्या आगमनाची चाहूल लागताच आणि पावसाळा जसजसा जवळ येऊ लागला आहे, तसतशी उरण तालुक्यातील बळीराजाची शेतांची मशागत करण्यासाठी मोठी लगबग सुरू झाली आहे. शेताचे बांध व्यवस्थित करणे, बांधांच्या खांडी बुजवणे, भात रोपांच्या वाफ्यांसाठी राब भाजणे आणि शेतातील कचरा-घाण वेचून जमीन साफ करणे अशा विविध कामांमध्ये सध्या शेतकरी गुंतले आहेत. सध्या उन्हाचा कडाका तीव्र असतानाही, त्याची अजिबात तमा न बाळगता या हंगामात पुन्हा एकदा या काळ्या मातीतून सोने उगविण्यासाठी येथील शेतकरी शेतात घाम गाळताना दिसत आहेत.