काटोल: तीव्र उष्माघाताचा बस प्रवाशाला फटका; प्रवासादरम्यानच एसटी बस मध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू
Katol, Nagpur | Apr 26, 2026 एप्रिल महिन्यातील जीवघेण्या उन्हाचा तडाखा नागपूर जिल्ह्याला बसत असून, यात एका व्यक्तीचा बळी गेला आहे. लग्नासाठी नातेवाईकांच्या घरी निघालेल्या लक्ष्मण अमृत पाटील वय ५५ यांचा एस.टी. बसमध्ये प्रवास करत असताना उष्माघातामुळे मृत्यू झाला. या घटनेने पाटील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण पाटील हे मांडवी येथील रहिवासी होते. ते आज तेलगाव येथून एस.टी. बसने काटोल येथे नातेवाईकांच्या लग्न कार्यासाठी निघाले ह