काटोल: काटोल आगारात पाच 'राजमाता जिजाऊ' बसेसचे थाटात लोकार्पण; आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
Katol, Nagpur | Apr 30, 2026 काटोल तालुक्यातील प्रवाशांची सोय आणि एसटी महामंडळाच्या ताफ्यात आधुनिकता आणण्याच्या उद्देशाने आज काटोल आगार येथे पाच नवीन “राजमाता जिजाऊ”बसेसचे लोकार्पण करण्यात आले. स्थानिक आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते फित कापून या बसेसचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले.यावेळी बोलताना आमदार चरणसिंग ठाकूर यांनी सांगितले की, नवीन बसेसच्या समावेशामुळे काटोल आगाराची सेवा अधिक सक्षम होणार आहे.