उरण: जासईत तलावात बुडून तीन चिमुरड्यांचा मृत्यू
Uran, Raigad | Jun 9, 2026 तरण तालुक्यातील जासई गावात तलावात आंघोळीसाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. एकाच वेळी तीन निष्पाप जीवांचा अंत झाल्याने संपूर्ण जासई गावावर आणि उरण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. ही दुर्घटना शनिवारी घडली. जासई गावातील एका तलावात तीन लहान मुली आंघोळीसाठी उतरल्या होत्या. मात्र, पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने त्या अचानक खोल पाण्यात गेल्या आणि बुडू लागल्या.