नागपूर शहर: नागपुरात प्राणघातक अपघात: मोपेड च्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, महिला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
18 ऑगस्टला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस मुख्यालय काटोल रोड, गिटखिदान, नागपूर येथे हा अपघात घडला. मृत व्यक्तीचे नाव विक्रांत गोकुळ दुबे असे सांगण्यात आले आहे.आरोपी महिला जुही खान हिने तिची मोपेड गाडी भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून, वाहतुकीचे नियम न पाळता यु-टर्न घेतल्याने दुचाकीला धडक दिली.गंभीर जखमी झालेल्या विक्रांत दुबे यांना मेयो आणि नंतर मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. फिर्यादी पत्नी श्रीमती राणी विक्रांत दुब