वेंगुर्ला: शिरोडा-वेळागरमध्ये 38 वर्षांनंतर ताज हॉटेल प्रकल्पाला ग्रीन सिग्नल
शिरोडा-वेळागर येथील 38 वर्षे प्रलंबीत ताज हॉटेल प्रकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी झाली. पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प पुन्हा चालू झाला आहे. स्थानीय तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्मितीमुळे भाजप कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.