उमरेड: : उमरेड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: चोरीचे दोन गुन्हे उघड, १८. ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त
Umred, Nagpur | Jul 5, 2026 नागपूर जिल्हा ग्रामीण पोलिसांनी चोरीच्या दोन गुन्ह्यांचा यशस्वी तपास करत एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १८ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.फिर्यादी आनंद प्रकाश कोंडावार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा ट्रक उमरेड येथील ट्रोपो रेडिएटर कंपनीसमोर उभा केला होता.