कामठी: कामठीत हनुमान जन्मोत्सवाचा उत्साह; गांधी चौकातून भव्य शोभायात्रेला प्रारंभ
शहरात हनुमान जन्मोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, आज ३ एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता सुमारास ऐतिहासिक गांधी चौक येथून भव्य शोभायात्रेला मोठ्या थाटामाटात सुरुवात झाली.यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती 'जय श्रीराम' आणि 'पवनपुत्र हनुमान की जय' च्या जयघोषाने संपूर्ण कामठी परिसर दुमदुमून गेला आहे.या भव्य शोभायात्रेत हनुमानाची विलोभनीय मूर्ती आणि विविध धार्मिक देखावे सादर करणारे चित्ररथ भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.