उरण: उरण शहरात ५४ इमारती धोकादायक
Uran, Raigad | Jun 7, 2026 पावसाळ्यात जीर्ण झालेल्या इमारती अथवा घरे कोसळून मोठी जीवित व वित्तहानी होऊ नये, यासाठी उरण नगरपरिषदेने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नगरपालिकेतर्फे शहरात करण्यात आलेल्या विशेष मान्सूनपूर्व सर्वेक्षणात तब्बल ५४ इमारती धोकादायक आणि चार इमारती या अतिधोकादायक असून त्या कधीही कोसळण्याची भिती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व धोकादायक इमारतींना उरण नगरपालिकेने तात्काळ कायदेशीर नोटिसा बजावण्याचे काम पूर्ण केले असल्याची माहिती नगरपालिकेच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे.