रामटेक: नागपूर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांची मनसर येथील श्याम भारत गॅस एजन्सीला अकस्मात भेट
Ramtek, Nagpur | Mar 14, 2026 आखाती युद्धामुळे एलपीजी गॅस सिलेंडरचा भडका गॅस ग्राहकांत उडाला असतानाच गॅस वितरकांवर प्रशासनाची करडी नजर आहे. अशातच नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी शनिवार दिनांक 14 मार्चला सायंकाळी चार ते साडेचार वाजता च्या दरम्यान मनसर येथील श्याम भारत गॅस एजन्सीला आकस्मित भेट देऊन एकंदरीत परिस्थिती व कामकाजाची पाहणी केली.