काटोल: सहा वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला सश्रम कारावास
Katol, Nagpur | May 16, 2026 काटोल पोलीस स्टेशन अंतर्गत २०११ मध्ये नोंदवलेल्या एका गुन्ह्यात माननीय न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली आहे. आरोपी संजय रामकृष्ण बुटे (वय ४१ वर्षे, रा. सायखेडा, जि. छिंदवाडा, मध्य प्रदेश) याने ६ वर्षांच्या चिमुरडीला आणि तिच्या १० वर्षांच्या भावाला नवीन कपडे देण्याच्या बहाण्याने पळवून नेले होते. त्यानंतर सिंदी शिवारातील शेताजवळ नेऊन त्याने बालिकेवर लैंगिक अत्याचार केला होता.