काटोल: कोंढाळीत मंगळसूत्र चोरणाऱ्या चार महिलांना अटक; मुद्देमाल जप्त
Katol, Nagpur | Jul 5, 2026 कोंढाळी बस स्टॉपवर एका महिलेच्या बॅगेतून १ लाख रुपये किमतीचे १० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पळणाऱ्या चार महिला आरोपींना कोंढाळी पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. पोलिसांनी चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करून तो फिर्यादीला परत केला असून, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.