उरण: भोंदूगिरी प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरातने चाणजे, ता.उरण येथे जमीन घेतल्याचे उघड
Uran, Raigad | Apr 23, 2026 नाशिकच्या भोंदूगिरी प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरातने चाणजे, ता.उरण येथे जमीन घेतल्याचे उघड झालेले आहे. जमीन व्यवहाराने केवळ महसूलच नव्हे, तर निबंधक यंत्रणेच्या पारदर्शकतेवरही मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. कारण, ज्या दिवशी अशोक खरात अटकेत गेला, त्याच दिवशी त्याची फरार पत्नी कल्पना अशोक खरात हिच्या नावावर जमिनीच्या नोंदीची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.