कामठी: भविष्यातील पाणी प्रश्न लक्षात घेऊन नगरपरिषदांनी पाणीपुरवठा प्रस्ताव साकारण्याची आवश्यकता : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मूलभूत सेवा सुविधा उत्तम प्रकारे पोहोचविण्याची जबाबदारी नगरपरिषद व पालिका प्रशासनावर आहे. गावाचा प्रथम नागरिक म्हणून जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मूलभूत गरजांपैकी असलेल्या उद्दिष्टांवर नगराध्यक्षांनी प्राधान्यक्रम निश्चित केला पाहिजे.