काटोल: गळपुरा येथे दारू विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Katol, Nagpur | Apr 16, 2026 पोलीस ठाणे काटोल हद्दीतील गळपुरा येथे दारू विकणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव राजू मोदरकर असे सांगण्यात आले आहे. काटोल पोलिसांनी दारूबंदी कायदा अंतर्गत ही कार्यवाही केली आहे. पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छापा मार कार्यवाही करून आरोपीला रंगेहात पकडण्यात आले.