महाड: महावितरणच्या 'वॉरियर्स'नी ८ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर शहर उजळले
Mahad, Raigad | May 11, 2026 महाड शहराला बसलेल्या अवकाळी पावसाच्या आणि वादळाच्या तडाख्यानंतर विस्कळीत झालेला वीजपुरवठा अखेर ८ तासांच्या प्रयत्नानंतर रात्री उशिरा पूर्ववत झाला. महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पावसाची पर्वा न करता 'युद्धपातळीवर' काम करत रात्री १० वाजता शहराचा मुख्य वीजपुरवठा सुरू केला. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने महाड शहरात एन्ट्री केली. या वादळाचा मोठा फटका नवेनगर, पंचशील नगर, आयटीआय कॉलेज (चांदे ग्राउंड) आणि पीजी सिटी परिसराला बसला.