वेंगुर्ला: वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा गणपती मंदिराची १५० वर्षांची आगळीवेगळी प्रथा
वेंगुर्ला तालुक्यातल्या उभादांडा गावातील गणपती मंदिरात दिवाळीला गणपती स्थापना होऊन विसर्जन होळीच्या दोन दिवस आधी होतं. १५० वर्ष जुन्या या परंपरेत माघ कृष्ण संकष्टी चतुर्थीला भव्य जत्रा भरते, ज्याला कोल्हापूर, मुंबई, गोवा आणि सिंधुदुर्ग येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.