उमरेड: उमरेड तालुक्यातील सारडा वस्त्रालयला आग, सुदैवाने जीवितहानी नाही
Umred, Nagpur | Apr 5, 2026 उमरेड येथील प्रसिद्ध कपडा व्यवसाय कमल किशोर सारडा यांच्या सारडा वस्त्रालय या दुकानाला भीषण आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार सुधीर पारवे यांनी घटनास्थळाची पाहणी केली प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटने आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.