बदनापूर: भाजपा संपर्क कार्यावर काँग्रेस सरकारच्या काळात लावण्यात आलेल्या आणीबाणीचा काळा दिवस म्हणून साजरा
Badnapur, Jalna | Jun 25, 2026 आज दिनांक 25 जून 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास बदनापूर शहरातील भाजपा संपर्क कार्यालयावर काँग्रेस सरकारने 1975 मध्ये जी आणीबाणी लावली होती त्या आणीबाणीचा दिवस आज आहे, आणि हा दिवस भाजपा कार्यकर्त्यांनी शेकडोच्या संख्येने एकत्र येत काळा दिवस म्हणून साजरा केला आहे,कारण या आणीबाणी मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली होती प्रसारमाध्यमांच्या कामकाजावर सुद्धा बंधने घालत लोकशाही संपवण्याचा घाट काँग्रेसने केला होता त्यामुळे हा काळा दिवस म्हणूनच साजरा करण्यात आला.