म्हसळा: पाणीटंचाईवर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प प्रभावी उपाय
Mhasla, Raigad | May 7, 2026 मागील दोन-तीन वर्षापासून महाड शहरासह तालुक्यात भेडसावणाऱ्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाड नगरपरिषदेने शहरांतील सुमारे 200 गृहनिर्माण संस्थांना रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पासाठी शासनाच्या योजनेअंतर्गत सहकार्य करावे अशी मागणी गृहनिर्माण सोसायटीचे रायगड जिल्हा अध्यक्ष राजाराम पाटील यांनी नगरपरिषद व स्थानिक प्रशासनाकडे केली आहे. शहरावर ओढवलेल्या अभूतपूर्व पाणीटंचाईने प्रशासन आणि नागरिक दोघांनाही धोक्याची घंटा दिली आहे.