आज शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास सुतारवाडीतील गीताबाग कार्यालयात म्हसळा तालुक्यातील शिवसेनेचे प्रसाद बोर्ले, स्वप्निल चांदोरकर, इम्रान काजी, हेमंत कांबळे, नामदेव धुमकर, इम्तियाज मुकादम यांच्यासह विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. पक्षाचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने सर्व पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रवादी परिवारात स्वागत केले आणि पक्षकार्यासाठी शुभेच्छा दिल्या. पक्षात नव्याने सहभागी झालेल्या सहकाऱ्यांशी संवाद साधताना ‘पक्षाची विचारधारा, पक्षनेतृत्वाचे कार्य आणि विकासाचा दृष्टीकोन तळागाळापर्यंत पोहोचवून म्हसळा तालुक्यात पक्षविस्तार आणि संघटन मजबूत करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षातील सर्व जुन्या नव्या सहकाऱ्यांनी एकजुटीने आणि निष्ठेने प्रचारकार्यात कार्यरत राहावे’, असे आवाहन केले.