पाच नोव्हेंबरला रात्री सात वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे अंबाजरी हद्दीतील शिवाजीनगर येथे राहणारे अनंत आंबेकर हे घराला कुलूप लावून पायी फिरायला गेले असता अज्ञात आरोपीने त्यांच्या घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले रोख रक्कम आठ लाख रुपये चोरून नेले. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे