उरण: उरणमध्ये रात्रीच्या वेळी मातीचोरीला पेव
Uran, Raigad | May 8, 2026 उरण तालुक्यातील चाणजे, चिर्ले, वेश्वी, दिघोडे, विंधणे, चिरनेर, कळंबुसरे, मोठी जुई, कोप्रोली, पिरकोन, सारडे, वशेणी, पुनाडे परिसरातून केवळ दिवसाच नव्हे तर रात्रीच्या वेळी देखील माती उत्खनन करण्याच्या प्रकारांचे पेव फुटले आहे. येथील अनेक ठिकाणी डोंगरांमध्ये अवैध उत्खनन सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे ज्या तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात त्यांच्या नाका खाली हे भूमाफिया माती उत्खनन करीत आहे, याची सुतराम माहिती देखली या अधिकाऱ्यांना नसल्याने शासनाचे कोट्यवधीचे नुकसान होत आहे.