महाड: रायगड किल्ला परिसरातील 48 अनधिकृत बांधकामदारांना महसूल विभागामार्फत नोटीसा
Mahad, Raigad | Apr 4, 2026 किल्ले रायगडला युनेस्को कडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यानंतर, या ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनासाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडी आणि पाचाड परिसरातील तब्बल ४८ अनधिकृत बांधकामदारांना महाड तहसीलदार कार्यालयामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, केवळ कागदोपत्री नोटिसा न थांबता प्रशासनाने प्रत्यक्ष कारवाई करावी, अशी मागणी शिवभक्तांकडून होत आहे.