उमरेड: माजी आमदार राजू पारवे यांनी निभावले पित्याचे कर्तव्य; कोरोनात अनाथ झालेल्या रागिणीचे थाटात कन्यादान
Umred, Nagpur | May 7, 2026 कोरोना महामारीच्या काळोखात ज्यांचे सर्वस्व हरपले, अशा कुटुंबांसाठी माणुसकीचा हात देणारे अनेक प्रसंग समोर येत आहेत. असाच एक हृदयस्पर्शी विवाह सोहळा आज उमरेड येथे संपन्न झाला. कोरोना काळात आपल्या दोन्ही पालकांना गमावलेल्या रागिणी डडमल या कन्येचे कन्यादान माजी आमदार राजू पारवे यांनी स्वतः पुढाकार घेऊन केले आणि एका अनाथ मुलीला सासरी सुखरूप पाठवून सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श घालून दिला.२०२२ मध्ये डडमल परिवारावर काळाने घाला घातला होता.