स्मार्ट मीटरचा ‘ऑटो कट’, मग काठीने ट्रिप का? कल्याणमध्ये महावितरणच्या कारभारावर ग्राहकांचा संताप
कल्याण पश्चिमेतील न्यू कृष्णा अपार्टमेंटमध्ये बिल थकल्याने महावितरण कर्मचारी कडून स्मार्ट मीटरची ट्रिप लाकडी काठीने बंद करण्यात आली.
स्मार्ट मीटरमध्ये वीजपुरवठा आपोआप बंद होण्याची सुविधा असल्याने ग्राहकांमध्ये या कारवाईबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
एकीकडे काठीने ट्रिप बंद केल्याची चर्चा असताना, दुसरीकडे महावितरणच्या नोंदीनुसार स्मार्ट मीटर बसवण्यात आला; मात्र ग्राहकाकडे स्मार्ट मीटरच गायब असल्याचा आरोप आहे.
संबंधित ग्राहकाला गेल्या सहा महिन्यांपासून सुमारे पंधरा हजार रुपयांचे वीज बिल येत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
महावितरणने अशा पद्धतीने मीटर बंद केले जात नसल्याचे सांगत, संबंधित प्रकाराची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.
Kalyan, Thane | Oct 3, 2026