HPV लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करा; गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला रोखण्यासाठी लस घ्या!
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांचे गोंदियातील नागरिकांना आवाहन
3k views | Gondia, Maharashtra | Mar 11, 2026 गोंदिया: महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांपैकी 'गर्भाशय मुखाचा कर्करोग' (Cervical Cancer) हा अत्यंत गंभीर परंतु प्रतिबंधात्मक उपाय उपलब्ध असलेला आजार आहे. या आजाराला मुळापासून रोखण्यासाठी HPV (Human Papillomavirus) लस अत्यंत प्रभावी आहे. मात्र, समाजात या लसीबाबत अनेक चुकीचे समज पसरलेले आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन गोंदियाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी केले आहे.