कामठी: कौटुंबिक वादातून आई आणि मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न; मुलाचा मृत्यू, आईची प्रकृती चिंताजनक
नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रमनगर रेल्वे चौकीजवळ रविवारी रात्री एका कौटुंबिक वादातून अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादाला कंटाळून आई आणि मुलाने एकत्र येऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.या दुर्दैवी घटनेमध्ये मुलाचा मृत्यू झाला असून, आईची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.