महाड: महाड-पोलादपूरमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा
Mahad, Raigad | Apr 24, 2026 महाड शहरासह परिसरात गुरुवारी (दि.२३) दुपारी साडेचार ते पाच या वेळेत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे व्यावसायिकांची एकच धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकाळपासूनच तापमान ४३ अंशांपर्यंत पोहोचल्याने सायंकाळी पावसाची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात होती. दुपारी साडेचारच्या सुमारास सुरू झालेला पाऊस काही काळ मुसळधार स्वरूपात कोसळला. मात्र, प्राथमिक माहितीनुसार महाड शहरात मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.