चेंबूरच्या बीपीसीएल कंपनी जवळ केमिकलच्या टँकरला लागली आग
चेंबूरच्या बीपीसीएल कंपनी जवळ शुक्रवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी दुपारी ०१ च्या सुमारास उभा असलेल्या केमिकल टँकरला अचानक लागली भिषण आग या आगीत केमिकल टँकर जळून खाक घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल होऊन आगीवरती अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले आहे या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून टँकरचे मात्र मोठे नुकसान झालेले आहे या घटनेमुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती